“मला मुख्यमंत्री व इतर कोणालाही सांगायची गरज वाटत नाही” :- जितेंद्र आव्हाड रोखठोक बोलले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दिवा येथील एमएमआरडीएच्या घर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री भेट देऊन आंदोलन स्थगित केले. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दलित आणि मुस्लिमविरोधी आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. महापालिकेत आतापर्यंत इतके आयुक्त होऊन गेले. पण, त्यात कणा नसलेला हे पहिले आयुक्त आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. “इथे खूप आयुक्त होऊन गेले. जैस्वाल कसे वागायचे हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यांच्यानंतर हे आयुक्त येणं आणि त्यांचं वागण दृष्टीत येतं. जैस्वाल संपूर्ण शहर सुंदर करुन गेले. यांनी ठाण्याचे किती दौरे केले सांगावं. कळव्याची खाडी पार करुन कधी गेलेत का विचारा? आतापर्यंत बोलत नव्हतो पण कार्यकर्त्याचा अपमान होत असेल तर मी मंत्री आहे कधीच विसरुन जाईन,” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
“मी सत्तेत आहे म्हणून काय अन्याय सहन करेन. मला मुख्यमंत्री किंवा इतर कोणाला सांगायची गरज वाटत नाही. माझं आयुक्तांबद्दल जे मत आहे ते आज पहिल्यांदा प्रदर्शित केलं आहे. मी आयुक्त हटाव वैगेरे मागणीच्या मागे लागणार नाही. आयुक्तांचं हे वागणं योग्य नाही. त्यांनी पक्षपाती असू नये,” असं आव्हाड म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….