मुख्यमंत्री चन्नी यांच्या कुटुंबीयावर ईडीचे छापे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंदिगड :- देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर राजकीय धुळवडीला सुरुवातही झाली. पंजाबमध्ये 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडत आहे.
मात्र, त्याआधी घडणाऱ्या घटनांनी वातावरण गरम झालंय. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या नातेवाईकांवर ईडीने छापे (ED Raid) टाकले आहेत.
सक्तवसुली संचलनालयाने आज पंजाबमध्ये काही ठिकाणी छापेमारी केली. छापे टाकलेल्या व्यक्ती मुख्यमंत्र्यांशी संबंधित असल्याच समोर आलंय. चन्नी यांच्या कुटुंबीयांवरच ईडीने धाड मारली आहे. वाळूमाफिया भूपिंदरसिंग हनी यांच्या काही मालमत्तांची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर हा वाद उफाळून आला आहे.
आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही संबंधित घटना अयोग्य असल्याचं म्हटलं.
पंजाबमध्ये एकूण 10 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. छापे टाकण्यात आलेल्या व्यक्ती चन्नींचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील ईडीच्या या धाडींमुळे पंजाबचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
नातेवाईकांच्या मालमत्तांवर छापा टाकला जात आहे. ते मला टार्गेट करत आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री चन्नी यांनी केला. हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. आम्ही यासाठी लढण्यास तयार आहोत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही असेच घडलं, असे ते म्हणाले.