जिल्ह्यातील 58 हजार महिलांना मिळाला मातृवंदना योजनेचा लाभ ; सर्व महिलांना योजनेच्या लाभ मिळावा यासाठी विशेष मोहिम राबवा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश ; 27 कोटी 18 लाख रकम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 17 जानेवारी :- गरोदरपणात महिलांना योग्य विश्रांती आणि पोषण मिळावे, स्तनदा मातांचे आरोग्य सुधारणे, श्रमीक महिलांच्या वेतनाची हानी भरून काढणे, अल्प पोषणाचा प्रभाव कमी करणे यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजने सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत डिसेंबर 2017 पासून आतापर्यत पहिल्यांदा माता बनणाऱ्या 62 हजार 853 महिलांनी नोंदणी केली असून त्यापैकी 58 हजार 50 लाभार्थी महिलांच्या खात्यात रुपये 27 कोटी 18 लाख लाभाची रकम जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा योजनेतून कोणीही माता सुटू नये यासाठी विशेष मोहिम राबवून गरोदर मांताची व स्तनदा मातांची नोंदणी व पडताळणी करण्याचे तसेच मागील दोन वर्षात ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही त्यांना देखील योजनेचा लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा माता व बालसंगोपान अधिकारी तथा लसिकरण अधिकारी सुहास कोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया, तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेज इतर संबंधीत अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात 2021-22 या वर्षात 11 हजार 468 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती समन्वयक पौर्णिमा गजभिये यांनी सादर केली.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..