कोविड विरूद्धच्या लढाईत सर्वांनी लस घेवून प्रशासनाला सहकार्य करावे कोविडचा तीसरा डोज घेतांना :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 17 जानेवारी :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज कोरोना लसचा बुस्टर डोज वंजारी फैल येथील नगरपरिषदेच्या शाळेतील कोरोना लसिकरण केंद्रावर घेतला. कोविड विरूद्ध सुरू असलेल्या लढाईत सर्वांनी लसीकरण पुर्ण करून प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
लस पुर्णपणे सुरक्षीत असून मी स्वत: कोरोना लसचा तीसरा डोज घेतला आहे. ज्यांनी अद्याप कोरोना लसचा पहिला किंवा दुसरा डोज घेतला नाही त्यांनी लवकरात लवकर लस घेवून स्वत:ला सुरक्षीत करावे. तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षावरील सहव्याधीग्रस्त पात्र नागरिकांनी कोरोना बुस्टर डोज घेवून आपले लसिकरण पुर्ण करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी येडगे यांना डॉ. नाझीया काजी यांनी लस दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, आरोग्य अधिकारी डॉ. रमा बाजोरिया तसेच लसिकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..