काळजी घ्या ; पुढील 24 तासात थंडीची लाट ; हवामान खात्याचा इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मागील आठवड्यात पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर पुढील चोवीस तासात थंडीचा कडाका वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
पुढील 24 तासात उत्तर आणि मध्य भारतात थंड दिवस नोंदवला जाईल.
तसेच काही ठिकाणी तीव्र थंड दिवस (Severe cold day) नोंदवला जाणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यानंतर थंडी हळूहळू कमी होईल, अशी माहिती के.एस. होसाळीकर यांनी दिली.

21 जानेवारीपासून भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा घसरला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळते. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भात गारपीट झाल्यानंतर वातावरणात गारवा पसरला आहे. त्यानंतर आता उत्तर भारत आणि मध्य भारतात थंडीची लाट आल्यास राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पारा आणखी खाली जाऊ शकतो. त्यामुळे थंडी वाढणार असल्याची शक्यता बळावली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….