मगोपच्या बड्या नेत्यांने भाजपची ऑफर नाकारली ; पक्ष प्रवेशाला नकार ; उमेदवारांसाठी शोधाशोध सुरुच…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पणजी :- भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी अचानक डिचोली मतदारसंघाबाबत वेगळी खेळी कालपासून सुरू केली. मगोपचे नेते नरेश सावळ यांना भाजपने पक्षप्रवेशाची ऑफर दिली.
सावळ यांनी ती नाकारली. राजेश पाटणेकर यांच्याऐवजी डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना तिकीट देण्याचा विचार भाजप करू लागला आहे.
आमदार राजेश पाटणेकर यांना कोविडची लागण झाली, शिवाय त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत पूर्वीएवढा रस राहिलेला नसावा, असे पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना वाटते. भाजपच्या तिकिटाचा विचार केला तर पाटणेकर हेच अजून प्रबळ उमेदवार आहेत. शिवाय कार्यकर्तेही पाटणेकरांसोबत आहेत पण सरकारने पाटणेकर यांना नोकऱ्यांचा कोटा दिला नाही. डिचोली मतदार संघातील ज्या व्यक्तींना नोकऱ्या द्याव्यात, अशी शिफारस पाटणेकर यांनी केली होती, त्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत. यामुळे पाटणेकर यांचे काही समर्थक नाऊमेद झाले.
मुख्यमंत्री सावंत तसेच भाजप संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने काल नरेश सावळ यांच्याशी चर्चा केली. मात्र, सावळ यांनी आपण मगो पक्ष सोडून कुठेच जाणार नाही, असे भाजप नेत्यांना सांगितल्याची माहिती मिळाली. सावळ हे मगोपचे उमेदवार आहेत. यानंतर सायंकाळी भाजपच्या नेतृत्वाकडून डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली गेली. शेट्ये यांनी ऑफर स्वीकारलेली नाही. शेट्ये यांनी अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार सुरु केला आहे. शेट्ये हे अपक्ष असूनही प्रबळ मानले जातात. भाजपचे तिकीट वाटप दोन दिवसात जाहीर होईल. यात डिचोलीविषयी काय निर्णय होतो, हे जाणून घेण्यास कार्यकर्ते इच्छुक आहेत.
…तर शिल्पाचा मार्ग मोकळा
दरम्यान, रात्री उशिरा डॉ. शेट्ये यांनी आपल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. शेट्ये यांनी अपक्षच लढावे असे त्यावेळी ठरले. यामुळे शिल्पा नाईक यांना डिचोलीत भाजपचे तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, असे भाजपमधील एका गटाकडून मानले जात आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….