कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत 171 कलाकारांचे प्रस्ताव पात्र जिल्ह्यातील एकल कलाकारांनी प्रस्ताव सादर करण्याचे :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 14 जानेवारी :- प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेले कलाकार यांना शासनाच्या कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी दिनांक 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले होते. याअंतर्गत प्राप्त झालेल्या 676 प्रस्तांवाची तपसणी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली असून त्यातील 171 प्रस्ताव पात्र ठरविण्यात आलेत.
सदर प्रस्ताव कार्यवाहीस्तव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एकरकमी अर्थसहाय्य देण्यात येणार असून अद्याप ज्यांनी अर्ज सादर केले नाही त्या कलाकारांनी आपला प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
एकल कलाकार लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीची बैठक आज दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, समितीचे सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी राजेश देवते, नगरपालिका प्रशासन अधिकारी सतिश गावंडे, मुख्याधिकारी माधुरी मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.
एकल कलाकारांकरीता पात्रता निकष व अटी व योजनेची माहिती शासन निर्णयात दिली असून, अर्जाचा नमुना व आवश्यक माहिती संबंधीत तहसिल कार्यालय, पंचायत समिती व महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in यवतमाळ जिल्हा प्रशासनाचे संकेतस्थळ www.yavatmal.gov.in यावर तसेच http://www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….