महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ; 24 तासांत 46,406 रुग्णाची नोंद…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसून गेल्या 24 तासात राज्यात 46,406 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर आज एकाही ओमिक्रॉनबाधिताची नोंद करण्यात आलेली नाही.
दरम्यान, आज राज्यात ओमिक्रॉनच्या एकाही रुग्णांची नोंद करण्यात आलेली नसून, आतापर्यंत राज्यात 1,367 ओमिक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 775 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 21 हजार 477 रुग्णांवर उपचार सुरु असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.39 टक्के नोंदविण्यात आला आहे. सध्या राज्यात 17 लाख 95 हजार 631 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर, 9124 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमिक्रॉन बाबत आरोग्य मंत्रालयाकडून रणनीतीत बदल
रुग्णालयाच्या आयसीयू विभागामध्ये दाखल झालेल्या आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेन्सिंग केलले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग किती धोकादायक आहे हे तपासण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….