मराठी भाषेवर मान्यवर वक्त्यांच्या मार्गदर्शनाची मेजवाणी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ 14 ते 28 जानेवारी……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 13 जानेवारी :- मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, ग्रंथालये इत्यादी सर्व संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा उपयोग जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ साजरा करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाद्वारे 14 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत सलग 14 दिवस ऑनलाईन वेबीनार द्वारे रोज दुपारी 1 ते 2 या कालावधीत मराठी भाषेवर मान्यवराच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात डॉ. काशिनाथ बऱ्हाटे (मराठीच्या बोली), प्रा.डॉ.अजय देशपांडे (मराठी भाषेचे वर्तमान), डॉ. रमाकांत कोलते (मराठी संतपरंपरा), डॉ. सिद्धार्थ भगत (मराठीतील शेरोशायरी), डॉ. पवन मांडवकर (मराठी साहित्याची उत्पती व विकास), पद्माकर मलकापूरे (यवतमाळ जिल्ह्यातील संतपरंपरा), प्रवीण देशमुख (शिवचरित्र), प्रा. किशोर बुटले (मराठी भाषेची महती), डॉ. प्रवीण बनसोड (महानुभव पंथाचे मराठी भाषेतील योगदान), डॉ. अशोक कांबळे (दलित साहित्य), माधव सरकुंडे (आदिवासी साहित्य), प्रा. घनश्याम दरणे (तुकडोजी महाराज व ग्रामगीता), प्रा.डॉ. अशोक राणा (मिथकांची भाषा), डॉ. छाया महाले (संत तुकाराम भाषासौंदर्य) हे मान्यवर वक्ते संबंधीत विषयावर माहिती देणार आहेत.
तरी सदर कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे https://meet.google.com/kou-hssp-vsc या लिंकवरून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…