भाजपचे आमदार व माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपचे आमदार आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना त्यांच्या कुटुंबीयांसह ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ओसामा समशेर खान (वय 48) या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी वांद्रे येथून अटक केली आहे.
पोलिसांच्याच प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.

आमदार आशिष शेलार यांना कुटुंबियांसह ठार करण्याची धमकी देणारा फोन कॉल आला होता. याबाबत त्यांनी ताबडतोब पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती तसेच त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील या धमकी संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र लिहिले होते.
त्यानंतर काही तासांमध्येच मुंबई पोलिसांनी ओसामा समशेर खान या व्यक्तीला आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात वांद्रे येथून अटक केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..