गेल्या 24 तासात 44 पॉझिटिव्ह ; पाच कोरोनामुक्त ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1749 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 146
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 08 जानेवारी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात 44 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 133 व बाहेर जिल्ह्यात 13 अशी एकूण 146 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1284 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 44 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1240 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73133 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71199 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 44 रूग्णांमध्ये 16 महिला व 28 पुरूष असून त्यात दारव्हा तालुक्यात एक, दिग्रस एक, महागाव एक, पांढरकवडा तीन, राळेगाव दोन, वणी दोन, यवतमाळ येथील 30 व इतर जिल्ह्यातील चार रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 92 हजार 164 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 18 हजार 972 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.23 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 3.43 आहे तर मृत्यूदर 2.44 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1749 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 20 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1749 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 20 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 7674 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….