कॉंग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा , निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- राष्ट्रवादीला बाजूला ठेवून सेनेला सोबत घेण्याच्या योजनेला तूर्तास विराम देत स्वबळाचा नारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी दिली.
निवडणुका कधीही होऊ शकतात, त्यामुळे तयारीला लागण्यासही प्रदेशाध्यक्षांनी बजावले आहे. संघटन व सदस्यनोंदणीवर भर देण्याचा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश व शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत आयोजित केली होती. या बैठकीत ते राष्ट्रवादीला बाजूला ठेवून सेनेसोबत सख्य साधण्याचा मंत्र देणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी तयारीसुद्धा केली होती. मात्र, ऐनवेळी या विषयाला तूर्तास विराम देत प्रदेशाध्यक्षांनी पक्ष संघटन व सदस्य नोंदणीवर भर देण्याचा मंत्र दिला.
महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात नियोजित असल्या तरी त्या कोविड संक्रमणाच्या पाश्र्वभूमिवर काही काळ पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणूक आयोगाची भूमिका बघता निवडणुकीसाठी तयार राहण्यास प्रदेशाध्यक्षांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना बजावले. कोविड संक्रमणाच्या पाश्र्वभूमिवर निवडणुका स्थगित होणार नसून त्या केव्हाही होऊ शकतात. या निवडणुकांत राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांच्यासोबत आघाडी करण्याचा विचार नसल्याने स्वबळावर निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. त्यामुळे बहुतेक इच्छुकांना उमेदवारी दिल्या जाणार आहे. त्यामुळे गाफील न राहता तयारीला लागण्याचा मंत्र देण्यात आला आहे. तयारी करताना बूथ कमिटी, सदस्य नोंदणीवर भर देण्यास सांगण्यात आले. मुंबईतील टिळक भवन येथे पार पडलेल्या बैठकीस प्रदेश कार्यकारिणीतील स्थानिक पदाधिकारी, शहराध्यक्ष, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष, एनएसयूआय, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होते

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..