माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद च्या तर्फे आज रोजी पत्रकार दिना निमित्त पत्रकारांना डायरी-पेन व पुष्पगुच्छ देऊन केले सन्मानित…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुसद येथील समाजसेवी संघटना माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या वतीने पुसद मधील सर्व पत्रकारांना डायरी-पेन व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. माणुसकीची भिंत ही मागील सहा वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवून समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करत असते, जसे की उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना व तेथील गरजूंना दररोज दोन वेळा मोफत अन्नदान व फळे वाटप करून मदत करत असते. गोरगरिबांना कपडे वाटप करणे असे अनेक वेगवेगळे उपक्रम माणुसकीची भिंत चे सदस्य राबवत असतात. असाच एक उपक्रम म्हणजे पुसद बस स्टॅन्ड येथे सकाळी 11 वाजता पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारां च्या लेखणी मुळेच अन्याय अत्याचाराला वाचा फोडल्या जाऊ शकतात, जनसामान्याचा आवाज बुलंद करणारा हा खरा पत्रकार आहे म्हणून लोकशाहीचा चौथ्या स्तंभची आजच्या काळात महत्त्वाची भूमिका आहे. सकारात्मक पत्रकारिता निकोप सामाजिक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक आहे.आजच्या काळात पत्रकारांची महत्त्वाची भूमिका आहे, अशाच पत्रकारांचा सत्कार माणुसकीची भिंत पुसद कडून बस स्टँड येथे करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शरदभाऊ मैद हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून श्री अँड.आशिषभाऊ देशमुख जेष्ठ पत्रकार श्री के.जी.चव्हाण सर, श्री पंकजपाल महाराज, श्री परशराम नरवाडे सर यांची मंचावर उपस्थिती होती. सुरुवातीला राष्टसंत गाडगेबाबा आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्व.वसंतरावजी नाईक, स्व.सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांना व युवा पत्रकार स्व.संजय हनवते यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ व डायरी-पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनिलभाऊ ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाला सर्वश्री के.जी. चव्हाण,प्रा.दिनकर गुल्हाने, रवी देशपांडे, प्रा.अनिल चेंडकाळे,ललित सेता,मारोती भस्मे,अखिलेश अग्रवाल,दीपक हरिमकर,संजय रेक्कावार, मनोहर बोंबले, योगेंद्र पाठक, दीपक महाडिक,राजेश ढोले , स्वप्नील माहुरे,संदेश कान्हु,हमीद शेख,शंकर माहुरे,सय्यद फैज्जोदिन,सय्यद मुजोबदिन,,अमोल व्हडगीरे,चंपत राठोड,मंगेश पवार,कैलास जगताप,श्रीरंग पाथरकर,रेश्मा लोखंडे,किशोर पोदाडे,मनीष दशरथकर,गणेश राठोड,रमेश चव्हाण,संतोष मस्के , अब्दुल रहमान चव्हाण , अनिल चव्हाण,श्रीकांत धर्माळे,यु एन वानखेडे,प्रशांत देशमुख,साकिब शाह,राम राठोड,रमेश पंडित,उमेश जाजु,बाबा खान,दिलीप खैरे,मुबशिर शेख,समीर रब्बानी,विनायक राठोड,बाबाराव उबाळे,हरिप्रसाद विश्वकर्मा,रुपेश अग्रवाल,दिनेश खाडेकर,राजू सोनुने,प्रकाश खंडागळे,बाबूलाल राठोड,विष्णू धुळे,कैलास श्रावणे,काकण साहेब,संजय पोंगाडे,समाधान केवटे, प्रकाश बोरके,,रमेश वाघमारे,बळवंत मनवर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन पुसद चे अध्यक्ष श्री गजानन जाधव, सचिव श्री जगत रावल, उपाध्यक्ष श्री संतोष गावंडे, संतोष जाधव, निलेश बोरकर, प्रमोद ठाकूर, जय राऊत,यश राऊत राजू गाडे, आदित्य जाधव ,संदीप आगलावे यांच्यासह महिला सदस्य मोनिका जाधव, अर्चना गावंडे, मोना रावल, प्रेरणा गावंडे यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला…. एस टी बसस्टँड ची जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल डेपो मॅनेजर श्री कोरट कर साहेब यांच्या सह सर्व उपस्थितांचे ठाकरे सरांनी विशेष आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.. उपरोक्त कार्यक्रम कोरोनाच्या नियमाचे पालन करून संपन्न झाला…