महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी मुंबईत निघाली पद भरती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 01 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे.
यासाठीची अधिसूचना (MSEB Holding Company Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. संचालक (प्रकल्प), संचालक (व्यावसायिक), वित्त समन्वयक या पदांसाठी ही भरती (MSEB jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची तारीख 21 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती संचालक प्रकल्प (Director Project) संचालक व्यावसायिक (Director Commercial) वित्त समन्वयक (Finance Coordinator) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संचालक प्रकल्प (Director Project) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मानताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे उमेदवारांना संबंधित पदाचा किंवा निगडित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित क्षेत्रांतील एकूण 20 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. नोकरीची सुवर्णसंधी! भारत राखीव बटालियनमध्ये 7वी पास उमेदवारांसाठी भरती संचालक व्यावसायिक (Director Commercial) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मानताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे उमेदवारांना संबंधित पदाचा किंवा निगडित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित क्षेत्रांतील एकूण 20 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वित्त समन्वयक (Finance Coordinator) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA/ICWA ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मानताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किंवा निगडित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना Finance / Accounts / Audits या क्षेत्रांतील एकूण 20 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवार हे MSEDCL / MSPGCL / MSETCL मधून सेवानिवृत्त झालेले असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार संचालक प्रकल्प (Director Project) – 1,50,000/- रुपये प्रतिमहिना संचालक व्यावसायिक (Director Commercial) – संबंधित पदानुसार वित्त समन्वयक (Finance Coordinator) – संबंधित पदानुसार ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता चीफ जनरल मॅनेजर (एचआर), एमएसईबी होल्डिंग कंपनी लि., हाँगकाँग बँक बिल्डिंग, चौथा मजला, एम.जी. रस्ता, किल्ला, मुंबई- 400001. Career Tips: Successful होण्यासाठी तुमच्याकडे ‘हे’ स्किल्स असणं आवश्यक; वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2022 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी संचालक प्रकल्प (Director Project) – इथे क्लिक करा संचालक व्यावसायिक (Director Commercial) – इथे क्लिक करा. वित्त समन्वयक (Finance Coordinator) – इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahadiscom.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.