जेवणासाठी जाणे पडले महागात..ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार
मृतक शंतनु माटाळकर
✍️पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव : ✍️
हॉटेलवर जेवण करून गावाकडे परतणाऱ्या दुचाकी स्वारास ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले आहे .ही दुर्दैवी घटना उमरखेड रोडवर असलेल्या मातोश्री शाळेजवळ आज ता.३० रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.ओम संजय सोळंके (२५) रा. पोहंडुळ,शंतनु माटाळकर (२३) रा. करंजखेड ता.महागाव असे मृतकाचे नाव आहेत.
मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार ,
मृतक हे नातेसंबंधाने मामेभाऊ आहे.ते आपल्या दुचाकी क्र. एमएच २९ क्यू ४३७२ ने उमरखेड रोडवर असलेल्या हॉटेलवर जेवण करून गावाकडे परत येत होते.दरम्यान पाठीमागून नांदेड वरून यवतमाळ कडे जाणाऱ्या ट्रक क्र.एम एच २६ बीई ५१९७ ने दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यात दुचाकीवरील दोघेही जागीच गतप्राण झाले.
हा अपघात एवढा भयंकर होता की अपघाता दरम्यान दुचाकी ही ट्रकच्या मागील अडकल्याने दुचाकी ट्रकसोबत जवळपास एक किमी पर्यंत फरकट गेली.ट्रकला अडकलेल्या दुचाकीवरून नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून जुनेबसस्थानकावर ट्रकचालकाला पकडले.अपघातात एका मृतकाचा मेंदू चेंदामेंदा झाला होता. तर दुसऱ्या मृतकाचे अवयव शरीरापासून वेगळे झाले होते.असे प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितले.घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अपघाता नंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहे. वृत्तलीहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.