राज्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची स्फोटक वाढ ; दिवसभरात तब्बल 198 नवे रुग्ण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोरोनाच्या मोठ्या रुग्णवाढीसोबतच राज्यात आज तब्बल 198 ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या मुंबईतल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 190 वर गेली आहे. तर ठाण्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात आतापर्यंत 450 रुग्णांची नोंद झाली आहे तर 125 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. एकिकडे कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ तर दुसरीकडे ओमिक्रॉन रुग्णांची झपाट्याने वाढ त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात ओमिक्रॉनचा विळखा वाढतोय, त्यामुळेच प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे, नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मुंबईतले नियम आणखी कडक करण्यात आले आहेत, एकट्या मुंबईतच नाही तर अनेक राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरातही नियम कडक करण्यात आले आहेत.
मुंबईत काय नवे नियम?
वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही. लोकांनी घरातच नवीन वर्षाचे स्वागत करावे, बाहेर पडू नये असे आवाहन महापालिकेकडून वारंवार करण्यात येत आहे.
पुण्यात काय नवे नियम?
31 डिसेंबर व नवीन वर्षाचे स्वागत नागरिकांनी साधेपणाने आपल्या घरीच साजरे करावे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांच्या एकत्र जमान्यावर बंदी घालण्यात आली आहे. 31 डिसेंबर व नूतन वर्षाच्या निमित्ताने बंदिस्त हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केवळ 50 टक्केच लोक उपस्थित राहतील. तर खुल्या मैदानात कार्यक्रमांना केवळ 25 टक्के लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी मास्क व सॅनिट्झर वापर जरूर करावा. कोरोनाच्या पार्शवभूमीवर 60 वर्षाच्या वरील नागरिकांनी व लहान मुलानांनी सुरक्षेच्या व आरोग्याच्या दृष्टीकोनाटाऊन घराच्या बाहेर जाणे शक्यतो टाळावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी रस्त्यावर , बागेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी जात असताना सॅनिटायझर व मास्कचा वापर बंधनकारक आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….