तोतया पोलीसांनी सराफा व्यावसियकाचे ३ तोळे सोने लांबविले ; कलगाव टी पॉइंट जवळील घटना ; आठवड्याभरापासून चोरीचे सत्र थांबेना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
पोलीस असल्याची बतावणी करून अंगझडती घेतली. आणि बॅग मध्ये असलेल्या मौल्यवान सोन्यावर हातचलाखी करून ३१ ग्रॅम सोने लांबविले.ही घटना महागाव ते माहूर रोडवर असलेल्या कलगाव टी पॉइंट जवळील ब्रीजजवळ मुडाणा येथील सुर्वणकार देविदास दारव्हेकर यांच्यासोबत आज (ता.३०) सकाळी ९ वाजता घडली आहे.
प्राप्त माहिती नुसार ,
देविदास दारव्हेकर हे सुवर्णकार रा.मुडाणा हे सराफा व्यवसायीक असून महागाव येथे बालाजी ज्वेलर्स नावाने त्यांचे दुकान आहे.नेहमीप्रमाणे दर गुरुवारी वेणी आणि लेवा येथे जावून आपला सराफा व्यवसाय करतात.
आज सकाळी लेवा येथे जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या दुचाकी स्वरांनी त्यांना आवाज देवून थांबविले.”आम्ही तुम्हाला आवाज देत आहो ,तुम्ही थांबत का नाही ,तुमच्या जवळ काय आहे ते आम्हाला दाखवा ” म्हणून त्यांचे खिसे तपासले. आणि अंगझडती घेतली. बॅगेची पाहणी केली.त्यावेळी बॅगेत असलेल्या डब्बितील ३१ ग्रॅम अंदाजित किंमत १ लाख ४१ हजार रुपयांच्या सोन्यावर अलगदपणे हातचलाखी करून त्यांना रवाना केले.देविदास यांनी कामाच्या ठिकाणी बॅगेत ठेवलेल्या सोन्याची पाहणी केली.मात्र त्यांना बॅगेत सोने नसल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी झडती घेतली ते तोतया पोलीस असून हातचलाखी करून सोने लंबविल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी महागाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात ४२०,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.