ऐन नवीन वर्षात रेल्वचा दणका ; येत्या 1 जानेवारी पासुनच नाशिक मार्गावरच्या तब्बल 18 गाड्या रद्द….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक :- ऐन नवीन वर्षांत रेल्वे विभागाने एक मोठा दणका दिलाय. येत्या 1 ते 9 जानेवारीच्या दरम्यान नाशिक मार्गावरच्या तब्बल 18 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या आणि बाहेरगावी जाण्यासाठी नियोजन करणाऱ्यांनी आत्ताच सावध राहिलेले बरे.
कारण एकतरी अजूनही एसटीसेवा सुरळीत सुरू नाही. त्यात या गाड्या रद्द झाल्यामुळे तुमची चांगलीच गैरसोय होऊ शकते. मुंबईत कळवा-दिवा दरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे तपोवन, पंचवटी, नंदीग्राम, जनशताब्दी या गाड्यांसह मनमाड-नाशिक मार्गावरच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगाब्लॉकमुळे ऐन नव्या वर्षाची सुरुवात अशी किरकिरीने होणार असून, या मार्गावरच्या प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत.
या गाड्या रद्द…
– नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस 1 व 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– जालना-मुंबई-जालना अप-डाऊन जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस ही गाडी 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी 2 व 3 जानेवारी रोजी धावणार नाही.
– नागपूर-मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस ही गाडी 1 व 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-जालना जनशताब्दी अप-डाऊन ही गाडी 8 व 9 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी अप-डाऊन ही गाडी 8 व 9 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी 8 व 9 जानेवारी रोजी धावणार नाही.
– नागपूर-मुंबई-नागपूर-सेवाग्राम एक्स्प्रेस अप-डाऊन ही गाडी अनुक्रमे 7, 8, 9, 10 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-नांदेड-मुंबई एक्प्रेस ही गाडी 8, 9, 10 जानेवारी रोजी धावणार नाही.
– नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस ही गाडी 7, 8, 9 जानेवारी रोजी धावणार नाही.
नाशिक-कल्याण मेमू लोकल कधी?
नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..