नारायण राणेंना पोलिसांकडून नोटीस….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधुदुर्ग :- भाजप आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत आले आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांना मारहाण केल्याचे आरोप नितेश राणे यांच्यावर आहेत.
याप्रकरणी लवकरच त्यांना अटकही केली जाण्याची शक्यता आहे. मात्र आता नितेश राणेंच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही कणकणवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत नितेश राणे प्रकरणावर चर्चा केली होती. यावेळी त्यांनी मला माहीत आहे नितेश राणे कुठे आहेत ते पण मी का सांगू? तसेच नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मी मूर्ख आहे का? असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यामुळे नारायण राणे अडचणीत आले आहेत. पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशन मध्ये हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
कणकवली पोलिसांनी राणेंना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस बजवाली होती. पोलीस नारायण राणेंची चौकशी करणार आहेत. नितेश राणेंविषयी माहिती घेण्यासाठी पोलिसांनी नारायण राणेंना बोलावलं आहे. त्यामुळे आता मुलाच्या पाठोपाठ नारायण राणेदेखील चांगलेच अडणीत आले आहेत.
दरम्यान, नितेश राणे संतोष परब मारहाण प्रकरणात अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. शिवाय नितेश राणे यांनी विधानसभेसमोर आदित्य ठाकरेंना डिवचल्यावरूनही सध्या गदारोळ माजला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी लवकरात लवकर नितेश राणेंना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….