ईडीची चार्जशीट दाखल ; अनिल देशमुख मुख्य आरोपी..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या कोठडीत आहेत. पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणात त्यांच्याविरोधात खटला सूरू असून, दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
कालच न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारत त्यांच्या कोठडीत १५ दिवसांची वाढ करण्याकत आली.
त्यानंतर आता ईडीने (ED) मुंबईतील पीएमएलए न्यायालयात मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात दाखल केलेल्या ७ हजार पानांच्या पुरवणी आरोपपत्रात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुख्य आरोपी म्हणून लिहीलं आहे.
ईडीने आज कोर्टात दाखल केलेल्या या आरोपपत्रात मुख्य आरोपी म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव लिहीलं आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या मुलांची नावं देखील असल्याचं समजतं आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….