राणेचा जामीन अर्ज फेटाळला ; आजच्या घडामोडी वर लक्ष….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधूदूर्ग :- आमदार नितेश राणेंच्या यांच्या अटकपुर्व जामीनावर आज (बुधवारी) सिंधूदूर्ग न्यायालयात सुनावणी हाेणार आहे.
ही सुनावणी दुपारच्या सत्रात हाेईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी (ता. २८) सरकार पक्षाचा युक्तीवाद पुर्ण हाेऊ शकला नाही. आज उर्वरित युक्तीवाद केला जाईल.
दरम्यान न्यायालयाने राणेंच्या अंतरिम जामीनाची मागणी फेटाळून लावल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मंगळवारी दिली. त्यामुळे राणेंना मंगळवारी तरी दिलासा मिळाला नव्हता. आज (बुधवार) न्यायालयीन प्रक्रियेकडे राज्यातील राजकीय क्षेत्राबराेबरच नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचार प्रमुख शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब हल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपुर्व जामीन अर्जावर आज (बुधवार) पुन्हा न्यायालयात सुनावणी हाेणार आहे. मंगळवारी राणेंच्या वकीलांचा युक्तीवाद पुर्ण झाल्यानंतर सरकार पक्षाच्यावतीने युक्तीवादास प्रारंभ झाला. सरकार पक्षास सखाेल मुद्दे मांडायचे हाेते. त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांच्याकडे सरकार पक्षाने वेळ मागतिला. त्यानूसार आज पुन्हा सुनावणी हाेत आहे.
दरम्यान राणे हे गाेव्यात (goa) गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या तपासासाठी पाेलिसांचे पथक गाेव्याला गेले आहे. परंतु पाेलिसांना राणे सापडू शकलेले नाहीत. आजच्या दुपारच्या सुनावणीवर सा-या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….