नेट कॅफेचे संचालाक तरुणांनी सुसाईट नोट लिहून केली आत्महत्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- तालुक्यात व शहरात रोज म्हटलं तरी गुन्ह्यांच्या आणि आत्महत्येच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत . पुसद शहरातील वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीरामपूर येथील पंचवटी हनुमान मंदिर परिसरा जवळ असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे . पण सगळ्यात भयंकर म्हणजे यामध्ये तरुण व्यवसायिकांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचं समोर आला आहे .
घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करीत असल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार , शहरातील ओम नेट कॅफेचे तरुण संचालक व्यवसायिकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . आत्महत्या करण्यापूर्वी या व्यवसायिकांने चिठ्ठी लिहून ठेवली असल्याची चर्चा आहे या चिठ्ठीमध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आला आहे या प्रकरणाची माहिती प्रतिक डिंगाबर निमकर यांनी संबंधित पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी तुर्तास मर्ग दाखल करण्यात आला आहे तर पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती आहे .
सुरेंद्र डिंगंबर निमकर वय ३२ वर्षे रा . पंचवटी मंदिर जवळ श्रीरामपूर असं आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचं नाव आहे . सुरेंद्र याचा मोती नगर येथील दत्त मंदिरासमोर असलेल्या चक्करवार कॉम्प्लेसमध्ये ओम नेट कॅफे चा व्यवसाय करीत होता . सुरेंद्र व प्रतीक हे दोघे भाऊ आपल्या राहत्या घरी आदल्या दिवशी जेवण करून नेहमीप्रमाणे घरातील हॉलमध्ये झोपले असताना सुरेंद्रने अचानक आत्महत्येपूर्वी टोकाचे पाऊल घेऊन सुसाईड नोट मध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहुन ठेवले तरुण व्यवसायिकांनी राहत्या घरातील दुसऱ्या खोलीतील स्लॅबच्या लोखंडी कडीला ओढणी द्वारे गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही घटना दि . २७ डिसेंबर २०२१ रोजी संपवली ही घटना दि . २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास उघड झाली . सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठूनपो पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे . सदर घटनेचा तपास वसंतनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बीट जमादार सुदाम आडे व कर्मचारी करीत आहेत .