कोरोना नियम डावलून आमदार संजय राठोडांनी जमवली गर्दी ; अभिनेत्री प्राजक्ता माळीला बघण्यासाठी तौबा गर्दी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हाण : ९६५७१७६१४८
यवतमाळ (दिग्रस) :- राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी त्यांच्या मतदारसंघातील दिग्रस येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमासाठी राठोड यांनी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची ‘हास्य जत्रा’ फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले यांना बोलावलं. त्यामुळे या कार्यक्रमात कलाकारांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे आमदार राठोड यांच्यावर शासनाचे करोना नियम डावलून कार्यक्रमाला गर्दी जमवल्याचा आरोप होत आहे.
एकीकडे राज्यात वाढत्या कोविड संसर्गामुळे राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. असं असताना सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार विकास कामाचा मोठा वाजागाजा करत भूमिपूजन केले.
दरम्यान या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी कलावंतांना बोलावण्यात आल्याचाही आरोप होतोय. सिने कलाकारांना बघण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने नियम फक्त सर्व सामान्य नागरिकांनाच आहेत का? असाही प्रश्न विचारला जातोय.

हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!