सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीतून करुणा मुंडे हे निवडणूक लडविणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदनगर :- जनतेच्या आग्रहास्तव राजकारणात येण्याचे जाहीर करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीतून निवडणूक लढवणार असल्याचे मुंडे यांच्या पत्नी करुणा यांनी जाहीर केले.
त्यांनी शिवशक्ती या राजकीय पक्षाच्या स्थापनेचीही घोषणा यावेळी केली.
येथे पत्रकार परिषदेत करुणा मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राज्यात भ्रष्टाचार वाढला आहे. मंत्र्यांचे कोट्यवधींचे घोटाळे उघड होत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोपात मश्गुल आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. राज्यभरात दौरे करून 30 तारखेला नगरमध्ये मेळावा घेऊन निवडणुकीचा बिगुल वाजविणार असल्याचे सांगितले.
मुंडे म्हणाल्या की, 90 टक्के निर्दोष जेलमध्ये आहेत. पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो. ड्रग्ज प्रकरण उजेडात आणणारे समीर वानखडे यांची जात कोणती आहे, यावरून गदारोळ उठला आहे. मला इतर पक्षांकडून ऑफर असतानाही मी त्या नाकारल्या.
महाराष्ट्रात दौरे करून लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तुळजापूर येथून शुभारंभ करणार असून, 30 जानेवारीला नगरमध्ये मोठा मेळावा घेणार आहे. यावेळी भाऊसाहेब शिंदे, रवी गवळी, दादासाहेब जावळे, मुरलीधर धात्रक, भारत भोसले आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….