देवेंद्र फडवणीस चा कडून संयम शिकवण्या सारखा आहे :- पंकजा मुंडेकडून भरसभेत कौतुक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा कमी होताना दिसत आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी एकत्र आल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी चक्क फडणवीसांचं भरसभेत कौतुक केलं आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा आहे, अशा शब्दात पंकजा यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे.
आष्टीत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या संयमाचं कौतुक केलं. काही लोक फडणवीसांकडे जागा वाटपासाठी गेले होते. 50-50 टक्के जागा मागत होते. त्यावेळी फडणवीसांनी संयम दाखवला. त्यांच्याकडून संयम शिकण्यासारखा आहे. त्यानंतर त्यांना मी एक फॉर्म्युला दिला. मी म्हटले 50 टक्के जागा दिल्या तर समोरच्याच विजय होत असतो. एकाला आष्टीत आणि दुसऱ्याला पाटोद्यात उभं करा. शिरुरमध्येही युती करा, असं मी सूचवलं होतं, असं पंकजा म्हणाल्या.
वितुष्ट कमी होतंय?
या विधानामुळे पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यातील वितुष्ट कमी होत चालली असल्याचं सांगितलं जात आहे. मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण सुरु असताना, या कार्यक्रमाचं मुंबईच प्रक्षेपण सुरू होतं, यावेळी देखील दोन्ही नेते एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेते एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले होते.
महाराष्ट्राचा दौरा करणार
राज्यात होऊ घातलेली नगरपंचायत निवडणूक ही काळी निवडणूक आहे. ओबीसींचा इम्पिरियल डाटा या सरकारने दिला पाहिजे. येणाऱ्या 26 जानेवारीपासून मी याच अनुषंगाने महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. एवढेच नाही तर मराठा आरक्षणाचा डाटा देखील राज्य सरकारने केंद्राकडे दिला पाहिजे, असही पंकजा म्हणाल्या.
बीडच्या रस्त्यांनी मणक्यांचा आजार झाला
राजकरणात मी गोपीनाथ मुंडेंची कन्या आहे. साहेबांनी मला बेरजेचे राजकारण शिकविले. मात्र इथं बीड जिल्ह्यात गुणाकाराचे राजकारण शिकले. बीड जिल्ह्याचे रस्ते बघता बघता मला मणक्याचा आजार झाला. मी पालमंत्री असताना कोटयवधीचा निधी दिला. मात्र दोन वर्षात काहीही निधी मिळाला नाही. आघाडीचे सरकार असले तरी राज्याला निधी द्यायाला केंद्र कमी पडणार नाही, असं त्या म्हणाल्या.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….