नागपुरातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा आज पासून….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपुरात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून (ता. १६) सुरू होणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आणि अटींच्या आधीन राहून शाळा सुरू करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी (Radhakrishnan b) यांनी दिले आहे.
पूर्वी नागपूर शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू (1st to 7th School start from Thursday) करण्याचा निर्णय १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा धेका पाहून शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला. मात्र, आता महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी (Radhakrishnan b) यांनी बुधवारी कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन गुरुवारपासून (ता. १६) शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. आठवी ते बारावीपर्यंत वर्ग यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, ओमिक्रॉनचे (Omicron) संकट बघता आयुक्त राधाकृष्णन बी यांनी १० डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी त्यांनी पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..