शरद पवारांनी ठरवलं 2024 मध्ये ही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात 2024 मध्ये होणाऱ्या निवडणूक महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार असून त्यावेळीदेखील महाविकास आघाडीचेच सरकार अस्तित्त्वात येईल, तसेच त्यावेळीदेखील शरद पवार यांच्या मनातीलच मुख्यमंत्री होईल आणि पवारांच्या मनातील मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. ते ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेवर टिकादेखील केली आहे.
येत्या काही महिन्यांत नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विभागवार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री जितेंद्र आव्हाड मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार योग्यरित्या कारभार करीत असून 2024 नंतरही हेच सरकार येणार असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही
मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्यात अडचण येते. शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असतो, असे बाहेर पसरवले जात आहे. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसून शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा उध्दव ठाकरे यांनाच असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री असलेल्या पदाला मान दिला पाहिजे. तसेच ते घेतील त्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे, अशी शिकवण पवारांनी आम्हाला दिली आहे, असे देखील आव्हाड यांनी या वेळी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..