“बाजार में जाओ मिठाई खाओ” राज्यपालाकडून ठाकरे सरकार वर टिका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा कलगीतुरा याआधी अनेकदा बघायला मिळाला आहे.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे पुणे दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते.
त्यानंतर आज संत ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभात ते उपस्थित राहिले होते. नुकतंच राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. यावर विचारले असता राज्यपालांनी बाजार मे जाओ मिठाई खाओ अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.
राज्यात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा कलगीतुरा याआधी अनेकदा बघायला मिळाला आहे. राज्यपालांचा लेटरबॉम्ब, त्यावर मुख्यमंत्र्यांकडून पत्रातून उत्तर असे घडले होते. शिवाय सत्ता स्थापनेवेळी राज्यपालांच्या भूमिकेवरसुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली होती. दरम्यान, आता भगतसिंह कोश्यारी यांनी दोन वेळा बाजार मे जाओ मिठाई खाओ असा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..