ओमायक्रॉनने थैमान घातलेल्या दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवासी मुंबईत ; आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीमुळे खळबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सध्या संपूर्ण जगावर करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने दहशतीचं वातावरण निर्माण केलं असताना दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन वेगाने फैलावत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले असताना आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीने चिंता वाढवली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत ‘ओमिक्रॉन’ संदर्भात चिंता व्यक्त, उद्धव ठाकरे म्हणाले, “संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी….”
आदित्य ठाकरे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. आतापर्यंत जे लोक आलेत त्यांची माहिती आपण मिळवली आहे. जे मुंबईत आहेत त्यांना पालिकेकडून फोन केले जात आहेत”. यासोबतच परदेशातून आलेल्या गेल्या १० दिवसांतील सर्वांना संपर्क साधून विचारपूस केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..