हिंगोलीत शेतकऱ्यांकडून सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सेनगाव (जि.हिंगोली) :-
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या गावात सर्व शेतकऱ्यांनी नक्षलवादी होण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे. विज बिल संपूर्ण माफ करा, त्वरित वीज पुरवठा चालू करा. कर्जमाफीची रक्कम द्या, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा, दिवसा विज पुरवठा द्या. अश्या मागण्या घेउन हे शेतकरी आंदोलन करीत आहेत
सरकारला या मागण्या मान्य नसतील तर आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी असून, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
याबाबात वारंवार मागणी करूनही तोडगा निघत नसल्याने आज तोकतोडा गावातील काही शेतकऱ्यांनी गावातील विहिरीत उड्या घेउन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि गावातील नागरिकांनी त्यांना वेळीच विहिरीबाहेर काढले. यावर तोडगा काढण्यासाठी गावात महसूल प्रशासनासह मोठा फौजफाटा दाखल झाला असून, गावकऱ्यासोबत प्रशासनाचे अधिकारी यांनी संबंधीत शेतकऱ्यांशी चर्चा केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..