१५ डिसेंबरपासून सुरु होणार आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पुढल्या महिन्यापासून म्हणजे १५ डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय हवाई सेवेला सुरुवात होणार आहे. अशी माहिती शुक्रवारी (दि.२६) हवाई वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी येथे दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यात ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर वेळोवेळी ही बंदी वाढविण्यात आली होती.
मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई सेवा बहाल केली जाणार असल्याचे अलीकडेच केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते. यावर अखेर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
जागतिक हवाई सेवा सुरू केली जाणार असली तरी सुरुवातीच्या टप्प्यात ज्या देशांमध्ये कोरोनाचा फैलाव कमी आहे, अशा देशांमध्येच विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे
गेल्या काही दिवसांपासून १४ देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढलेला आहे. या देशांसाठी हवाई सेवा उपलब्ध केली जाणार नसून सध्या राबविल्या जात असलेल्या बायो-बबल कार्यक्रमानुसार संबंधित देशांसाठी ठराविक विमाने सोडली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
विशेषतः युरोपियन देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर जात आहे.
युरोपियन देशांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला असून तो इतर स्ट्रेनपेक्षा जास्त घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे.