नागपूर विधान परिषदेसाठी काँग्रेस-भाजपा सामना रंगणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर :- राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानपरिषद निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातल्या एकूण ६ विधानपरिषद जागांसाठी निवडणूक नियोजित आहे. आज दुपारी ३ वाजता अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर राज्यातल्या विधानपरिषद निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालं आहे. यामध्ये कोल्हापूर, धुळे-नंदुरबार आणि मुंबईतल्या दोन जागांवर बिनविरोध निवडणूक होणार आहे. पण नागपूरमध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी दिली गेल्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
विधानसभा निवडणुकांवेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी न दिल्यामुळे भाजपामध्ये अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने त्यांचं पुनर्वसन केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नागपूर विधानपरिषद निवडणूक चर्चेत आली आहे. मात्र, इतर चार जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे या ठिकाणीही बिनविरोध निवडणूक होणार का आणि झाली तर कोण माघार घेणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..