राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक ; ४ ऑक्टोबरला मतदान
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
राज्यसभेतील सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलीआहे. ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे. यावेळी काँग्रेसकडून कोणाला संधी दिली जाते हे पहावं लागणार आहे.देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील रिक्त राज्यसभेच्या जागांवर ४ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी ही माहिती दिली. आयोगाने पाच राज्यांमध्ये रिक्त झालेल्या ६ राज्यसभा जागांच्या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. निवडणूक आयोगानुसार, त्याची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी केली जाईल.
महाराष्ट्रात काँग्रेस नेते राजीव शंकरराव सातव यांच्या निधनामुळे एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, मध्य प्रदेशातील थावरचंद गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.निवडणूक आयोगाच्या मते, तामिळनाडूतील राज्यसभेची जागा केपी मुनुसामी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली. त्यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत होता. याशिवाय, तामिळनाडूमधूनच आर. वैथिलिंगम यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे, ज्यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत होता.
६ मे २०२१ रोजी मानस रंजन भुनिया यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एक जागा रिक्त झाली आहे. मानस भुनिया आता ममता सरकारमध्ये मंत्री आहेत. याशिवाय बिसजित डमरे यांच्या राजीनाम्यानंतर आसाममध्ये एक जागा रिक्त झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे. ४ ऑक्टोबर रोजी मतदान होईत तसेच त्याच दिवशी मतमोजणी देखील होईल.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….