राज्यसभेसाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक तर डॉ.प्रज्ञा सातव यांना तिकीट देण्याचा पक्षश्रेष्ठीचा विचार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद:
राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. खासदारकीसाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक असले तरी सातव यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा पक्षात विचार सुरू आहे.राजीव सातव यांचे मे महिन्यात करोनामुळे निधन झाले. सातव यांच्या शोकसभेत राहुल गांधी व प्रियंका गांधी हे सहभागी झाले होते व तेव्हा राहुल यांनी सातव कुटुंबीयांची पक्ष काळजी घेईल, असे विधान केले होते. सातव यांची आई व पत्नीने अलीकडेच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या भेटी घेतल्या होत्या. गेल्याच महिन्यात जाहीर झालेल्या प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या यादीत सातव यांची पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. यावरून सातव यांच्या पत्नीला राज्यसभेवर संधी दिली जाईल, असे पक्षात मानले जात आहेत.
पक्षातील अनेक दिग्गज नेते या राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक आहेत. पक्षाचे सरचिटणीस
मुकुल वासनिक, संजय निरुपम, मिलिंद देवरा, रजनी पाटील आदी इच्छुक आहेत. राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनाही महाराष्ट्र किंवा तमिळनाडूमधून पक्षाने राज्यसभेवर संधी द्यावी, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश या राज्यांतील प्रत्येकी एक व तमिळनाडूतील दोन अशा राज्यसभेच्या एकूण सहा रिक्त जागांवर ४ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार असून गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.
राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होत असल्याने मतांच्या फाटाफुटीला संधी नसते. पक्षाने नेमलेल्या प्रतिनिधीला दाखवूनच मतदान करायचे असते. पक्षाच्या आदेशाच्या विरोधात मतदान केल्यास आमदारकी रद्द होते. खुल्या पद्धतीने मतदान असल्यानेच सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते काहीसे निर्धास्त आहेत. गुप्त मतदान पद्धतीमुळे मतांची फाटाफूट होण्याची शक्यता लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पावसाळी अधिवेशनात टाळण्यात आली होती. काँग्रेस खासदाराच्या निधनाने ही पोटनिवडणूक होत असल्याने काँग्रेस उमेदवाराला शिवसेना व राष्ट्रवादी पाठिंबा मिळण्यास काही अडचण येणार नाही. खुल्या पद्धतीने मतदान व सत्ताधाऱ्यांकडे पुरेसे संख्याबळ असल्याने भाजप ही पोटनिवडणूक फार प्रतिष्ठेची करण्याची शक्यता नाही.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…