इराणी टोळीने वृद्धास लुटले ; दोन अंगठ्या केल्या लंपास ; महागाव शहरातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
अधिकारी असल्याचा बनाव करून नागरिकांना लुटणाऱ्या इराणी गँगने शहरात एका वृद्धास लुटल्याची घटना आज दुपारी १ च्या सुमारास महागाव शहरातील फुलसावंगी रोडवर घडली आहे.
“आम्ही पोलीस असून चोरट्यांनी महागाव शहरात धमाकुळ घातला आहे.त्यामुळे अंगावरील सोन्याचे दागिने आणि खिशातील पैसे सांभाळून ठेवा.हातात आणि गळ्यात सोने घालू नका ” असे सांगून हातातील दोन अंगठ्या काढून ठेवण्यास सांगितले .हातचलाखी करून प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या अंगठ्या इराणी गँगने लंपास केल्या आहेत .सदर वृध्द हा महागाव तालुक्यातील टेंभी येथील असल्याचे समजते.पोलिसांनी शहरातील प्रमूख सीसीटिव्ही फुटेज तपासले परंतु इराणी टोळीचा थांगपत्ता लागला नाहीं. वृत्तलीहेपर्यंत घटनेची फिर्याद पोलीस स्टेशन ला देण्यात आली नव्हती.त्यामुळे सदर वृद्धाचे नाव कळू शकले नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..