जिवंत विद्युत तारेच्या धक्याने शेतकऱ्याच्या मृत्यू ; एक गंभीर जखमी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
शेतातील झाडावरील फांद्या तोडण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांचा विजेच्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना महागाव तालुक्यातील कलगावं शिवारात सकाळी ८ च्या सुमारास घडली आहे.तर एक मजुर गंभीर जखमी झाला आहे.देवानंद बाळाजी राऊत (४०) रा. कलगाव असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून अजगर खा पठाण हा मजूर गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ,
देवानंद राऊत यांचे महागाव येथे तिरुपती एजन्सी चे दुकान असून तो सध्या महागाव येथे स्थायिक आहे. आईच्या नावे दीड आणि मृतकाच्या नावे दीड असे तिन एकर सामायिक क्षेत्र आहे.पेरणीची तयारी असल्याने शेतात ये – जा करण्यासाठी बाभळीचे झाड अडसर ठरत असल्याने त्याच्या फांद्या तोडण्यासाठी सदर शेतकऱ्याने दोन मजूर नेले होते.शेतात जात असताना पाण्याचा डव साचल्याने पाण्यातून मार्ग काढत असताना जिवंत विद्युत तार पाण्यात पडलेला होता.मात्र जिवंत तार नसल्याचा भास झाल्याने पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नात असताना जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने जागीच गतप्राण झाला.सहकारी मजुरांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला.त्यात एक मजूर गंभीर जखमी झाल्याने त्याला सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.मृतक देवानंद राऊत यांच्या पाश्चात्य पत्नी,आई,वडील,आणि दोन मुले आहेत.
महावितरणच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा : माजी आमदार राजेंद्र नजरधने
विद्युत रोहित्र आणि लोंबलेल्या तारेबाबत महावितरण कडे अनेक तक्रारी आहेत.मात्र त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.मान्सून पूर्व नियोजन कोलमडल्याने
लोंबलल्या तारा वादळी वाऱ्यामुळे पडल्याने हा अनर्थ घडल्याने निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेला.याला महावितरण चे अधिकारी जबाबदार आहेत.दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी केली आहे .

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…