ग्रामीण पाणी टंचाई मुळे विहिरी अधिग्रहण करा :- प्रवीण ठाकरे… प्रलंबित देयके अदा करा ; बिडिओंना दिले निवेदन….

ग्रामीण पाणी टंचाई मुळे विहिरी अधिग्रहण करा :- प्रवीण ठाकरे…
प्रलंबित देयके अदा करा ; बिडिओंना दिले निवेदन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
उन्हाची चाहूल लागताच ग्रामीण भागात पाणी टंचाई भासू लागली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात पाणी पिण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे. पिण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहण करा आणि मागील वर्षी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे प्रलंबित देयके अदा करा अशी मागणी करंजखेड येथील सरपंच प्रवीण सीताराम ठाकरे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मागील वर्षी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुका प्रशासनाने शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहण केल्या होत्या.परंतु त्यांचे देयके अद्यापही मंजूर करण्यात आले नाही.परिणामी शेतकऱ्यांच्या फरफट झाली.आता पुन्हा उन्हाळा आल्याने ग्रामीण भागात ग्रामस्थांचा घसा कोरडा पडला आहे.मागील अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना देयके मिळाली नसल्याने यावर्षी शेतकरी विहिरी अधिग्रहण करण्यास नकार देत आहे.त्यामुळे मागील वर्षी विहिरी अधिग्रहण करण्यास समोर येत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे .शासनाकडे अधिग्रहण केलेल्या विहिरीचे प्रलंबित देयके देण्यात यावी .आणि नव्याने विहिरी अधिग्रहण करण्याची मागणी करंजखेड येथील सरपंच प्रवीण ठाकरे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….