नेटवर्क गुल अन फोन नॉट रीचेबल… वानोळा परिसरातील मोबाईल धारक त्रस्त , व्यवसायिक ग्राहकांना भुर्दंड…

नेटवर्क गुल अन फोन नॉट रीचेबल…
वानोळा परिसरातील मोबाईल धारक त्रस्त , व्यवसायिक ग्राहकांना भुर्दंड…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर/नांदेड :- (राजकिरण देशमुख)
सद्यस्थितीत मोबाइल हा प्रत्येकाच्या जगण्याचा भाग बनलेला आहे मोबाईल च्या भरवशावर अनेक गोष्टी अवलंबुन आहेत यावरच अनेकांचे व्यवसाय देखील अवलंबून आहेत त्यामुळे सदासर्वकाळ प्रत्येक क्षणाला मोबाईलला सोबत केल्या जाते आणि नागरिक त्यांच्या सोईनुसार विविध मोबाईल कंपण्याची सिमकार्ड वापरतात मात्र नेमक्या महत्वाच्या वेळेला या सिमकार्ड कंपण्याचे नेटवर्क गुल झाले की काय होते याचा अनुभव गत काही दिवसांपासून माहूर तालुक्यातील वानोळा परिसरातील नागरिक घेत आहेत.
मोबाईलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे फोर जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळे इंटरनेट सेवा न मिळणे , वापर कमी असताना देखील बिल जास्त येणे फोन न लागणे अशा विविध कारणांमुळे गत काही दिवसांपासून माहूर तालुक्यातील वानोळा भागातील बि एस.एन.एल. सह खाजगी कंपण्याच्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हा प्रकार गत महिनाभरात अनेक वेळा घडल्याने वानोळा परिसरातील व्यापारी , व्यावसायिक , सर्वसामान्य नागरिकाना आर्थिक फटका बसत आहे सुरुवातीला सुरळीत व प्रभावी पणे सेवा देणाऱ्या या कँपनी ने गेल्या काही दिवसापासून कहर केला आहे. अनेकांच्या मोबाईलला घरात असताना नेटवर्क राहत नाही तर या पंधरवड्यात दहा वेळा मोबाईल चे नेटवर्कच ठप्प पडले होते.बीएसएनएल चे नेटवर्क मागील पंधरा दिवसापासून विस्कळीत आहे.
या बद्दल तक्रार करण्यासाठी ही कँपणीच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन लावायचा म्हटल्यास फोनला रेंजच नसल्याने आता तक्रार करावी तरी कुणाकडे ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान अनेकांना या विस्कळीत सेवेचा फटका सोसावा लागत आहे.सबंधितांनी याकडे लक्ष देऊन वानोळा परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करावी.अशी मागणी व.ना.वि.चे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार राठोड यांनी केली आहे.
बिएसएनएल ची सेवा विस्कळीत
माहूर शहरासह वानोळा या ग्रामीण भागातील विविध कंपण्याचाही सदोष सेवेमुळे सर्वच कंपणान्याचे ग्राहक त्रासले आहेत प्रत्येक मोबाईल कंपणीच्या ग्राहकाला विचारल्यानंतर काहींना काही तक्रारी असल्याचे आढळून आले आहे यामध्ये शासनाच्या बिएसएनएल कंपणीचाही समावेश आहे.तालुक्यात मोबाईल सेवा पुरविणाऱ्या या कंपन्याचा मागोवा घेतला असताना विंदा करंदीकर यांची सब घोडे बारा टक्के ही कविता या मोबाईल कंपन्यांच्या सेवेला अगदी तंतोतंत लागू पडते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….