विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला, ‘या’ जागांवर होणार अदलाबदल ; कोणाच्या वाट्याला किती जागा..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांची निवडणूक जाहीर करताच महायुतीमध्ये अंतर्गत जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे.
विशेषतः कोकण स्थानिक स्वराज्य संस्था (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) आणि पुणे स्थानिक स्वराज्य संस्था या दोन जागांवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये उमेदवारीवरून उघड चढाओढ असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अखेर विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आला आहे.
राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे जागांवर हक्क नेमका कोणाचा, यावरून वरिष्ठ पातळीवर मोठी रस्सीखेच पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळावर प्राथमिक चर्चेस सुरुवात झाली असून सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडून संबंधित विधानपरिषद जागेवर दावा करण्यात येणार आहे. जर सदस्य संख्येचा विचार करता या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 12, तर शिवसेनेच्या वाट्याला 3 व राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा येण्याची शक्यता आहे.
आठवड्याभरात जागा वाटपावर महायुतीत एकमत होण्याची शक्यता
महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा होणार असून काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या प्राथमिक चर्चेतील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जागा वाटपावर होणार अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. येत्या आठवड्याभरात जागा वाटपावर महायुतीत एकमत होण्याची शक्यता आहे.
प्राथमिक चर्चेनुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे?
भाजप 12
शिवसेना 03
राष्ट्रवादी 02
कुठल्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा?
राष्ट्रवादी काँग्रेस – रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग, हिंगोली – परभणी
शिवसेना – ठाणे, नाशिक, यवतमाळ
भाजप – नागपूर, वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर – जालना, सातारा – सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा – गोंदिया, अमरावती, लातूर – धाराशीव – बीड, सोलापूर
प्राथमिक चर्चेनुसार विधानपरिदेच्या या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा पाहायला मिळणार आहे. भाजपचे नगरसेवकांचे संख्याबळ अधिक असल्याने पक्षाने अधिक जागांवर दावा केला आहे. महायुतीतील मित्र पक्ष शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीला (अजित पवार) या पक्षांच्या मागणीनुसार भाजपची सध्या तरी इच्छा दिसत नाही.

भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा….
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कायमचा ब्रेक..? शरद पवारांच्या बैठकीनंतर बड्या नेत्यांकडून मोठा खुलासा….
उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, वर्धा ४७.१, नागपूर ४६.६ अंशांवर…
“एकतर ठोस करार करा, नाहीतर…” ट्रम्प यांनी इराणला दिला अंतिम इशारा ; आखातात युद्धाचे ढग..!
शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द ; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना….
राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटणार..?