सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महायुती सरकारमध्ये भाजपच वरचढ आहे, असे सांगण्याची संधी भाजपचे नेते मंडळी सोडत नाहीत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापुरात बोलताना गृह आणि महसूल ही दोनच खाती सरकारमध्ये महत्त्वाची असतात, असे विधान करून राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
ही दोन्ही खाती भाजपकडेच असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत सरकारमधील भाजपचे वजन अधिक असल्याचे सूचित करून त्यांनी मित्रपक्षांना एकप्रकारे इशारा दिल्याची चर्चा आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नव्या दाव्यामुळे महायुतीतील दोन्ही महत्त्वाची खाते भाजपकडे असल्याचे अधोरेखित करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. सरकारमध्ये भाजपच वरचढ असल्याचे सांगण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
राज्यातील सर्वच खाती महत्त्वाची आहेत. मात्र या सर्व खात्यांमध्ये महसूल आणि गृह ही दोन खाती अगदी अनादी काळापासून महत्त्वाची आहेत. मग इंग्रज असोत, किंवा मोगल काळ, त्या काळातही ही दोन खातीच महत्त्वाची होती. गृहखातं जनतेचे रक्षण करतं तर महसूल खातं जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करतं, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारमधील पक्षांना अप्रत्यक्षपणे भाजपचे वजन जास्त असल्याचे सांगितले.
बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी?
राज्यात भाजपचे १३२ आमदार आहेत. त्यामुळेच साहजिक सत्ता वाटपात भारतीय जनता पक्षाचा वाटा सर्वाधिक आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणातील समीकरणे बदलली आहेत. तुलनेत एकनाथ शिंदे भाजपच्या वर्चस्ववादी आणि विस्तारवादी राजकारणाला सशक्तपणे तोंड देत असल्याने भाजपपुढे त्यांचे आव्हान झाले. अशावेळी सरकारमध्ये केवळ दोन खाती महत्त्वाची असतात, असे सांगणे म्हणजे राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी तर नाही ना… अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….