थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चेन्नई :- “तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय यांनी नुकतीच शपथ घेतली. विजय यांच्यासोबत तमिळनाडू मंत्रिमंडळासाठी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी त्या यादीला मंजुरी दिली.
लोक भवन, तमिळनाडू येथून १० मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली.
प्रसिद्धीपत्रकानुसार, मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित विजय यांनी ९ मे रोजी मंत्रिमंडळातील नऊ सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. त्यानंतर तमिळनाडूचे राज्यपाल यांनी या शिफारसीला मान्यता दिली.
मंत्रिपदासाठी मंजुरी मिळालेल्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
N. Anand – एन. आनंद
Aadhav Arjuna – आधव अर्जुना
Dr. K.G. Arunraj – डॉ. के. जी. अरुणराज
K.A. Sengottaiyan – के. ए. सेंगोट्टैयन
P. Venkataramanan – पी. वेंकटरमणन
R. Nirmalkumar – आर. निर्मलकुमार
Rajmohan – राजमोहन
Dr. TK. Prabhu – डॉ. टीके प्रभू
S. Keerthana – एस. कीर्तन
या नव्या मंत्रिमंडळामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया आता वेगाने पुढे जात असून, शपथविधीनंतर खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. Tamilaga Vettri Kazhagam (टीव्हीके) पक्षाने बहुमताच्या जवळ पोहोचत महत्त्वाची राजकीय ताकद दाखवली. त्यानंतर विविध पक्ष आणि अपक्ष आमदारांशी चर्चा सुरू झाली. विशेषतः काँग्रेस, व्हीसीके आणि आययूएमएलच्या पाठिंब्यामुळे विजय यांच्या नेतृत्वाला बळ मिळाले.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी विजय यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही चेन्नईत पोहोचून विजय यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रीय स्तरावरही तमिळनाडूच्या राजकारणाची चर्चा रंगली. ९ मे रोजी विजय यांनी राज्यपालांकडे मंत्रिमंडळासाठी नऊ सदस्यांची यादी सादर केली.
१० मे रोजी राज्यपालांनी त्या यादीला मंजुरी दिली. नव्या मंत्रिमंडळात युवा चेहरे, व्यावसायिक आणि अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नईतील शपथविधी सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता खातेवाटप आणि सरकारच्या पहिल्या निर्णयांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….