महाराष्ट्र, पश्चिम बंगालनंतर आता पंजाब निशाण्यावर”, आपच्या मंत्र्याला १०० कोटींच्या घोटाळ्यात ईडीकडून अटक; संतप्त प्रतिक्रिया समोर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शनिवारी (९ मे) पंजाबचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) ज्येष्ठ नेते संजीव अरोरा यांना अटक केली. मोबाईल फोनची खरेदी आणि निर्यातीशी संबंधित मोठ्या प्रमाणावरील मनी लाँड्रिंग आणि बनावट जीएसटी बिलिंग प्रकरणाच्या संदर्भात आठ तासांहून अधिक काळ झाडाझडती घेतल्यांनतर ही कारवाई करण्यात आली.
दिल्ली, गुरुग्राम आणि चंदीगडमधील पाच ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. यामध्ये ‘हॅम्प्टन स्काय रिअल्टी लिमिटेड’चे कार्यालय आणि मंत्र्यांशी संबंधित मालमत्तांचा समावेश होता. संजीव अरोरा यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मोबाईल फोनची बनावट जीएसटी खरेदी दाखवली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या व्यवहारांचा वापर करून दुबईतून बेकायदेशीर पैसे भारतात आणल्याचा (राउंड ट्रिपिंग) संशय ईडीने व्यक्त केला आहे. तपासादरम्यान अरोरा यांनी सहकार्य केले नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांना न्यायालयात हजर करून ईडी त्यांची कोठडी मागणार आहे.
भाजपामध्ये सामील करून घेण्यासाठी….
“आज सकाळपासून पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे सुरू आहेत. देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सीबीआय आणि ईडी अनुक्रमे भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग थांबवण्यासाठी नव्हे, तर इतर पक्ष फोडण्यासाठी आणि इतर राजकीय नेत्यांना धमकावून त्यांना भाजपामध्ये सामील करून घेण्यासाठी काम करत आहेत. संजीव अरोरा यांच्यावरील छापा हे त्याच दिशेने उचललेले पाऊल आहे”, असा आरोप आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला.
आता पंजाब निशाण्यावर
तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपावर केंद्रीय यंत्रणांचा “राजकीय शस्त्र” म्हणून वापर केल्याचा आरोप केला. निवडणुका जवळ आल्या की अशा कारवाया वाढतात आणि आता पंजाब भाजपाच्या निशाण्यावर असल्याचे त्यांनी म्हटले. “फार पूर्वीपासून ते (ईडी) आपल्या राजकारणासाठी त्यांचा वापर करत आले आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगाल असो. आता पंजाब त्यांच्या निशाण्यावर आहे”, असे मान म्हणाले. “ईडीच्या छाप्यांचा उद्देश काळा पैसा किंवा कागदपत्रे जप्त करणे हा नसतो. नेत्यांच्या व्यवसायांना आणि प्रतिष्ठेला धोका निर्माण करून त्यांच्यावर भाजपामध्ये सामील होण्यासाठी दबाव आणणे, हाच खरा हेतू असतो”, असंही ते पुढे म्हणाले.
ही संजीव अरोरा यांच्यावर एका महिन्यात झालेली दुसरी कारवाई आहे. यापूर्वी १७ एप्रिल रोजी ‘फेमा’ (FEMA) अंतर्गत त्यांच्या मालमत्तांची झडती घेण्यात आली होती. संजीव अरोरा हे लुधियाना पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत.

गोकुळच्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना धुलाई यंत्रात टाकून स्वच्छ करू नये – सुप्रिया सुळे….
रवींद्रनाथ टागोरांच्या पत्राच्या आडून ओवेसी यांनी केला ‘वंदे मातरम’ ला विरोध….
राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
महाराष्ट्र, पश्चिम बंगालनंतर आता पंजाब निशाण्यावर”, आपच्या मंत्र्याला १०० कोटींच्या घोटाळ्यात ईडीकडून अटक; संतप्त प्रतिक्रिया समोर….