गोकुळच्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना धुलाई यंत्रात टाकून स्वच्छ करू नये – सुप्रिया सुळे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गोकुळमध्ये काहीतरी चूक दिसली असेल म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळवर प्रशासक नियुक्त केला आहे. या संस्थेत भ्रष्टाचार झाला असेल तर मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना धुलाई यंत्रामध्ये टाकून स्वच्छ करू नये, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.
आणखी एखादे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या धुलाई यंत्रामध्ये (वॉशिंग मशीन) जाऊन साफ होणार असेल. आणि यात सर्वसामान्य शेतकरी भरडला जात असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर प्रशासक नियुक्त केला आहे. यामध्ये दाल मे कुछ काला है, कुछ तो गडबड है. महाराष्ट्र शासन प्रशासक नियुक्त करीत असेल आणि त्यांच्याच मित्र पक्षातील एक आमदार आरोप – प्रत्यारोप करीत असतील तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. गोकुळ मध्ये मुख्यमंत्र्यांनी राजकारण आणलेला आहे का हे मला माहिती नाही, गोकुळमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जी काही मदत उभी करावी लागेल ती सुप्रिया सुळे करेल. तर गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर शिक्षाही झालीच पाहिजे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.
कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांच्या निधनानंतर खासदार सुळे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत त्यांचे पुत्र जय पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. २०२९ च्या निवडणुकीत सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील, या आशयाचे वक्तव्य चांगलं चर्चेत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार हा मीच घालेन, असा उपरोधिक टोला लगावला. कोल्हापुरात खासदार सुळे पत्रकारांशी बोलत होत्या.
राज्यात शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पाऊस पडत आहे. सरसकट कर्ज माफी करू असा शब्द सरकारने दिलेला आहे. मात्र झालेली नाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता कसं जगायचं ? या शेतकऱ्यांबद्दल सरकारला आस्था नाही. कांदा, दूध आणि इतर उत्पादकांच्या बाबतीत शेतकऱ्याच्या विरोधी सरकारची भूमिका आहे. ज्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून सरकारला सत्तेत बसवले आहे त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी या सरकारची आहे. गेली तीन-चार वर्ष सातत्याने पुण्याची कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. देशात पुणे हे शिक्षणाचे माहेरघर होते मात्र आता त्याच पुण्याचा उल्लेख शिक्षणाऐवजी क्राइम रेट मध्ये होत आहे याच्यासारखं दुर्दैव कोणते नाही, अशी टीका त्यांनी केली.

भाजपा आमचा पहिला शत्रू’, सुवेंदू अधिकारींच्या शपथविधीनंतर ममता बॅनर्जींची टीका; विरोधी ऐक्याची हाक….
महाराष्ट्र, पश्चिम बंगालनंतर आता पंजाब निशाण्यावर”, आपच्या मंत्र्याला १०० कोटींच्या घोटाळ्यात ईडीकडून अटक; संतप्त प्रतिक्रिया समोर….
रवींद्रनाथ टागोरांच्या पत्राच्या आडून ओवेसी यांनी केला ‘वंदे मातरम’ ला विरोध….
राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
गोकुळच्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना धुलाई यंत्रात टाकून स्वच्छ करू नये – सुप्रिया सुळे….