निदा खान आणि मतीन पटेल न्यायालयात लढतील, माध्यमांनी ‘ दोषी ‘ ठरवण्याची गरज नाही, एमआयएमचे ओवेसी यांचे मत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
छ. संभाजीनगर :- “नाशिक येथे दाखल लैंगिक छळ आणि धर्मांतरास प्रोत्साहन देणाच्या गुन्ह्यातील आरोपी निदा खान तिला लपून राहण्यासाठी मदत करणारा सहआरोपी व एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल हे न्यायालयात लढतील.
त्यांचे निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध होईल. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे काय झाले. असे तर अनेक गुन्हे आमदार आणि खासदारांवर दाखल होत असतात. म्हणजे ते काय दोषी असतात काय असा सवाल बॅ. असदोद्दीन ओवेसी यांनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते पत्रकार बैठकीत बोलत होते.
त्या मुलीच्या घरी बुरखा होता, मोहम्मद पैगंबरावरील एक पुस्तक होते, या आधारे तिच्यावर आरोप करण्यात आले आहेत. बुरखा हा कधी अवैध ठरला किंवा धार्मिक पुस्तके ही मुस्लिम घरात असणारच. त्या मुलीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत ती न्यायालयात स्वत:ला सिद्ध करेल. तसेच मतीन पटेलही लढतील. न्यायालयापूर्वी माध्यमांमधून त्यांना दोषी ठरवले जात आहे. निदा खान प्रकरण केवळ माध्यमांमध्ये सुरू असणारा खटल्याच्या आधारे कसे ठरवता येईल. आमच्या न्यायालयावर विश्वास आहे. तेव्हा त्या विरोधात आम्ही लढू, असे ओवेसी म्हणाले. या सर्व प्रकरणाची ‘ एमआयएम’ संबंध जोडला जात आहे, असे म्हणतातच ओवेसी म्हणाले, आता किमान ‘ ब ‘ चमू म्हणून तरी आरोप करत नाहीत, हेही थोडे नाही काय ?
निदा खान हिस नाशिक पोलिसांनी नारेगाव मधून अटक केल्यानंतर तिला लपवून ठेवणारा नगरसेवक मतीन पटेल यास सहआरोपी करण्यात आले आहे. यावरुन शिवसेना आणि एमआयएम मध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. धर्मांतर घडवून आणण्यास प्रोत्साहन देणाऱ्या आरोपीस एमआयएमकडून साथ दिली जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात येत आहे. तसे निवेदनही शिवसेनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी मतीन न्यायालयात स्वत: सिद्ध करतील, अशी भूमिका घेतली आहे.
वंदे मातरम हे दूर्गा मातेचे गीत
गुरू रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या एका पत्र दशभूजा धारण करणाऱ्या दूर्गाचे वर्णन ‘ वंदे मातरम’ मध्ये आहे. त्यामुळे मुस्लिम या गीतास स्वीकारणार नाहीत असे म्हटले होते. टागोर यांनी लिहिलेल्या या मताशी आम्ही सहमत आहोत. त्यामुळे वंदे मातमला राष्ट्रगीत करण्याच्या निर्णयाच्या विरोधात मी संसदेमध्येही मत मांडले असल्याचे ओवेसे यांनी सांगितले. या अनुषंगाने पत्रातील मजकूराचा भागही ओवेसी यांनी पत्रकार बैठकीत वाचून दाखवला. आनंद मठ या पुस्तकातही अनेक मुस्लिम विरोधी वाक्य आहेत, ती तुम्हाला कदाचित आवडणार नाहीत, असेही ओवेसी म्हणाले.

रवींद्रनाथ टागोरांच्या पत्राच्या आडून ओवेसी यांनी केला ‘वंदे मातरम’ ला विरोध….
राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…