तमिळनाडूत मोठा ट्विस्ट..! थलापती विजय मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार; काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडली, एका अटीवर टीव्हीकेला पाठिंबा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चेन्नई :- “थलापती विजय यांचा पक्ष टीव्हीके तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. नवीन सरकार स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत.
काँग्रेस पक्षाने डीएमकेसोबतची आपली दीर्घकाळची युती तोडली आहे. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला आहे. थलापती विजय हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, टीव्हीकेसोबतची त्यांची युती केवळ या सरकारच्या स्थापनेसाठीच नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभेच्या भविष्यातील निवडणुकांसाठीही आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानंतर केंद्रातील ‘इंडिया ब्लॉक’मध्ये काँग्रेस डीएमकेसोबत राहील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला आपला पाठिंबा अधिकृतपणे जाहीर केला होता. काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व आणि तामिळनाडू काँग्रेस समिती यांच्यातील बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले की, टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांनी काँग्रेसकडे औपचारिकपणे पाठिंबा मागितला आहे.
त्यांनी सांगितले की, तामिळनाडूच्या जनतेने विशेषतः तरुणांनी धर्मनिरपेक्ष, प्रगतिशील आणि कल्याणकारी सरकारच्या बाजूने स्पष्ट आणि भक्कम कौल दिला आहे. या कौलाचा आदर करत, काँग्रेस पक्षाने टीव्हीकेला आपला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पाठिंबा एका अटीसह असेल. या आघाडीत भारतीय संविधानावर विश्वास न ठेवणाऱ्या कोणत्याही जातीयवादी शक्तींचा समावेश नसावा.
प्रसिद्धीपत्रकात असेही म्हटले आहे की, टीव्हीके आणि काँग्रेस यांच्यातील ही युती केवळ सरकार स्थापनेपुरती मर्यादित राहणार नाही, तर भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांमध्येही एकत्र काम करेल. पेरुंथलायवर कामराज, पेरियार आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या आदर्शांचे पालन करून सामाजिक न्याय आणि घटनात्मक मूल्यांना पुढे नेण्याची शपथ दोन्ही पक्ष घेतील.
सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर म्हणाले, मला टीव्हीकेकडून एक पत्र मिळाले आहे. ते आज संध्याकाळी मला भेटतील. त्यांच्याकडे बहुमत असून सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना बोलावले पाहिजे. होय माझी त्यांना भेटण्याची वेळ ठरली आहे. आता नवीन सरकार स्थापन होईल.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..