पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटींनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातीह एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशांत जगताप यांनी विचारसरणीचा मुद्दा उपस्थित करत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा प्रयोग कितपत नैतिक आहे, या चर्चेचा वाचा फोडली होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रयत्न बारगळला आहे असे वाटत असतानाच रविवारी बारामतीत गौतम अदानी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले आहे.
आता पुणे, पिंपरी-चिंचवडची महानगरपालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. तर मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादींनी वेगळ्याच प्रकारचे अंडरस्टँडिग केल्याचे दिसत आहे. आज दुपारी पुण्यात पत्रकार परिषद होणार असून यावेळी दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिकेत अजित पवार गट 125 तर शरद पवार गट 40 जागांवर लढेल, असे सांगितले जात आहे.
पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी तळवडे येथे केली. याच ठिकाणाहून त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत आगामी निवडणुकीत शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडनंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर यावर एकमत झाले असून आज दुपारी याबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाणार आहे.
अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार
मिळालेल्या माहितीनुसार, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित पवार गट सुमारे 125 जागा, तर शरद पवार गट 40 जागा लढवणार असल्याचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. दोन्ही गटांनी एकत्र येऊन पुण्यातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संयुक्तपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा झाल्यानंतर पुण्यातही तसाच निर्णय झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यात जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला, नेतृत्वाची भूमिका आणि आगामी रणनीती याबाबत सविस्तर माहिती दिली जाण्याची अपेक्षा आहे. पुण्याच्या राजकारणात ही युती कितपत प्रभावी ठरणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….