उमरखेड : पैनगंगा नदी पात्रात तहसीलदाराची धाड ; रेती उपसा करणारे पसार ; साहित्य केले जप्त
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा पात्रातून रेतीचा साठा उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच उमरखेड नायब तहसीलदार राणे यांनी गनिमी काव्याने धाड टाकली.मात्र रेती माफियांना सुगावा लागताच त्यांनी साहित्य नदीपात्रात सोडून तिथून पळ काढला . ही कार्यवाही सकाळच्या सुमारास करण्यात आल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
विदर्भ- मराठवाडा सीमेवर पैनगंगा नदी पात्रावर असणाऱ्या ईसापुर धरण 90 टक्के भरले असून नदीपात्रात कधी पण पाण्याचा प्रवाह वाढू शकतो त्यात बालकामगारांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत सुरू आहे. गांजेगाव पैनगंगा नदीपात्रातून अवैद्य रेतीची तस्करी होत असल्याने महसूल प्रशासन जागे खडबडून झाले आहे. उमरखेड तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह नायब तहसीलदार विश्वंभर यांनी आज पैनगंगा नदी पत्रावरील गांजेगाव नदी पात्रात धाड टाकली.मात्र रेती माफियांना पथकाचा सुगावा लागताच वाहनासह मराठवाड्याच्या दिशेने पसार झाल्याची घटना समोर येत आहेनायब तहसीलदार विशंभर राणे यांनी रेती माफियाना आवर घालण्याच्या प्रयत्नात रेती माफियांची साहित्य खोरे, टोपले जप्त करून परतावे लागले.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….