राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशचे पोलिसांनी घेतले ताब्यात ; हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटुंबांना भेटीसाठी जाताना केली कारवाई
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर
काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी नितीन राऊत चालले होते. पण नितीन राऊत यांना पोलिसांनी आझमगड सीमेवर रोखत पुढे जाण्याची परवानगी देण्यास नकार दिला. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. काँग्रेसने ट्विट करत ही माहिती दिली आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी तिथेच रस्त्यावर बसून ठि्य्या आंदोलनास सुरुवात केली होती.

काँग्रेसने ट्विट करत उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. युपी सरकार दलित सरपंच सत्यमेव जयते यांची हत्या रोखू शकलं नाही मात्र त्यांच्या घरी पोहोचणाऱ्या भावनांचा संदेश रोखत आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.आझमगड येथील बांसा गावातील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली होती. हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत दौऱ्यावर गेले असता त्यांना रोखण्यात आलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी नितीन राऊत यांना पुढे जाण्यास मनाई केली.पोलिसांनी रोखल्यााने नितीन राऊत यांनी तिथेच रस्त्यावर बसून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..