माणुसकीची भिंत तर्फे पोलीस खात्यात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल स्वातंत्र्य दिनी सत्कार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
माणुसकीची भिंत ही मागील चार वर्षापासून पुसद मधील व ग्रामीण रुग्णालय व पुसद परिसरातील गरीब गरजूना कपडे अन्नदान व माणुसकीची अनुदान कीट चे वाटप करून मदत करत आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माणुसकीची भिंत च्या सदस्यांनी पुसद मधील पोलीस खात्यातील कोरोना सारख्या महामारी च्या काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व एक जांबाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. वसंत नगर ठाणेदार प्रदीप सिंह परदेसी,निलेश शेळके पी एसआय एल सी बी पुसद ,शेख मकसूद ज्ञानोबा मुंडे ,शिवाजी चंद्रवंशी, अविनाश कदम, अशोक तडसे या सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळेस प्रभाकर टेटर, परसराम नरवाडे ,सुशांत महल्ले ,दीपक परिहार, मारुती भस्मे ,प्रशांत देशमुख, माणुसकीच्या भिंतीचे सदस्य गजानन जाधव, जगत रावल,संतोष गावंडे, सोनू पाटील, दीपक घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुशांत महल्ले यांनी केले