अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस शिपाई ठार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ढाणकी:
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत पोलीस शिपाई शासकीय कामासाठी यवतमाळ पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये टपाल घेऊन जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना निंगणुर शिवारामध्ये घडली आहे
बिटरगाव पोलीस स्टेशन प्राप्त माहितीनुसार पोलीस शिपाई निलेश बन हे आपल्या कार्यालयाची टपाल घेऊन कार्यालयीन कामाकरिता यवतमाळ पोलीस अधीक्षक कार्यालयात जात असताना निंगणुर घाटामध्ये सकाळी 11 च्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांची दुचाकी वाहन व पोलीस शिपाई निलेश बन नाल्यामध्ये कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस शिपाई बन यांचे शव विच्छेदन करण्या करिता प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे आणण्यात आले होते त्यावेळी आपले कार्य बजावताना पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
सदर घटनेचा तपास बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाय संदीप राठोड गजानन खरात रवी गीते सतीश चव्हाण हे करत आहे

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..